UPI Payment : यूपीआयद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी काही कंपन्या आधीच विविध नावांवर शुल्क घेत आहेत. परंतु, आता ही वसुली फक्त मोबाइल रिचार्जपुरतीच सीमित राहिलेली नाही.
UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे?
UPI Payment : सध्याच्या काळात यूपीआय पेमेंटशिवाय आपले रोजचे जीवन साधारणतः थांबले आहे. भाजीपासून सॅटेलाईट डिशपर्यंत सर्व व्यवहार आता ऑनलाईन होऊ लागले आहेत. अनेक वेळा विक्रेते थेट सांगतात की “रोख पेक्षा ऑनलाईन करा”. भारतात रोज लाखो यूपीआय व्यवहार होत आहेत. सध्या बाजारात अनेक प्लॅटफॉर्म्स यूपीआय पेमेंटसाठी सेवा देत आहेत.
UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे?
त्यात Paytm, Google Pay, आणि PhonePe हे प्रमुख UPI ॲप्स आहेत. या सर्व कंपन्या UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क घेत नाहीत आणि तुमचे पेमेंट्स मोफत आहेत. मात्र, हे मोफत फायदे लवकरच थांबू शकतात आणि शुल्क घेतले जाऊ शकते. एका कंपनीने तर शुल्क घेण्यास सुरुवातही केली आहे.
देशात UPI चा वापर प्रचंड प्रमाणात वाढला
डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रांझक्शनवर प्रोसेसिंग फी म्हणून गुगल पेने ग्राहकांकडून शुल्क घेतले. यामध्ये GST देखील समाविष्ट आहे. यूपीआयचा वापर आता फक्त दुकानदारांशीच मर्यादित नाही, तर इतर अनेक सेवांसाठीही होतो. आजकाल लोक पेट्रोल-डिझेल, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, विविध बिल पेमेंट्स, रेल्वे-फ्लाइट तिकीट, चित्रपट तिकीट, फास्टॅग, गॅस बुकिंग, मनी ट्रान्सफर, मेट्रो कार्ड रिचार्ज, विमा प्रीमियम आणि इतर अनेक सेवांसाठी यूपीआयचा वापर करत आहेत.