SatBara Utara Changed : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सातबारा उतारा हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आणि आता तब्बल 50 वर्षानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून खाते क्रमांकापासून ते व्यक्तीचे नाव कमी करण्यापर्यंत अशाप्रकारचे 11 बदल करण्यात आलेले आहेत. याबरोबरच काही महत्वाच्या सुधारणा देखील सातबारा उताऱ्यात करून या बादलांबरोबर सातबारा उतारा एक अधिक अचूक आणि अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. मग आता हे महत्वाचे बदल काय आहेत? कोण-कोणते आहेत? याची माहिती आपण खाली संपूर्ण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
सातबारा उताऱ्यात झाले 11 बदल पाहण्यासाठी
सातबारा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे शेतजमिनीचा अधिकार अभिलेख(महत्वाचा मालकी हक्क दाखवणारा पुरावा). यात दोन प्रमुख भाग असतात:
गावनमुना 7 – कोणत्या व्यक्तीच्या नावावर कोणत्या गावातील क्षेत्रात, किती जमीन आहे, हे स्पष्टपणे दर्शवतो.
गावनमुना 12 – नावावर असलेल्या जमिनीवर कोणत्या पिकांची लागवड झाली आहे, याची नोंद या नमुन्यावर ठेवली जाते.
आणि या नवीन 11 बदलांमुळे या दोन्ही दस्ताएवजामध्ये सुधारणा करून त्याला अधिक स्पष्ट आणि वापरण्यास सरल आणि सोपे बनवले आहे.
सातबारा उताऱ्यात झाले 11 बदल पाहण्यासाठी
नवीन बदल झालेल्या सातबारा उताऱ्याचा नागरिकांना काय होणार फायदा?
नवीन बदलांनी सातबारा उताऱ्याला अधिक माहितीपूर्ण बनवले आहे आणि महसूल विभागाच्या कामकाजात अचूकता व गती साधली आहे. 3 मार्च 2020 रोजी सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो ठेवण्यास मान्यता दिली. यामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट झाला आहे आणि नागरिकांना तो समजायला सोपा झाला आहे. त्याचबरोबर, डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाचे काम अधिक सुव्यवस्थित झाले आहे.