Sarpanch Salary Hike News : गावातील सरपंच व उपसरपंच यांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळते, पण ते खूप कमी होते. यावर २४ सप्टेंबर २०२४ रोजी शिंदे सरकारने जी आर काढून मानधन वाढवण्याची घोषणा केली होती. जरी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात मानधन वाढले नव्हते. आता, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सरकारने नवीन निर्णय काढला असून, यासाठी निधी देखील उपलब्ध केला आहे.
सरपंच व उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ, किती मिळतो?
गावाच्या विकासासाठी सरपंच आणि उपसरपंच यांना वेळ द्यावा लागतो, त्यामुळे सरकारने हे मानधन दिले आहे.
सरपंच आणि उपसरपंच हे गावाच्या मुख्य घटक आहेत, आणि गावाच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. शासकीय निधी मिळवण्यासाठी, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला जाऊन योजना तयार करणे, त्यांचा पाठपुरावा करणे हे काम त्यांना करावे लागते.