PFMS Payment Status : तुम्ही एखाद्या अनुदानाची अपेक्षा करत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले का, याबद्दल शंका असू शकते. किंवा कधीकधी खात्यात पैसे जमा होतात, पण ते नेमके कशासाठी आले आहेत, हे समजत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना गोंधळ होऊ शकतो, जसे की – हे पैसे पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी सिंचन योजना किंवा इतर शासनाच्या योजनांतील अनुदान असू शकतात. डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले जात आहे.
तुमच्या खात्यात आलेले अनुदानाचे पैसे आले का?
मात्र, काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा जीआर (सरकारी आदेश) प्रसारित झाला होता. त्यात 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये, ज्या मध्ये विदर्भ आणि मराठवाडा यांचा समावेश आहे, या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रेशन बंद करून प्रतिमाह 170 रुपये रोख अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत, प्रत्येक लाभार्थ्याला अनुदान मिळवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
तुमच्या खात्यात आलेले अनुदानाचे पैसे आले का?
आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना हे समजत नाही की, त्यांच्याजवळ आलेले पैसे कोणत्या योजनेचे आहेत. यामुळे शेतकरी संभ्रमित झाले आहेत. त्यामुळे आता हे अनुदान कशाच्या आधारावर आले, हे कसे ओळखायचे, ते पाहूयात.