Land Rules : महाराष्ट्र विधीमंडळाने तुकडेबंदी कायदा सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे जमिनीच्या तुकड्यांशी संबंधित व्यवहार अधिक सोपे आणि खर्चात कमी होणार आहेत. या सुधारित कायद्यामुळे अनेक प्रलंबित जमिनीचे व्यवहार नियमित करता येतील, तसेच शेतकरी, प्लॉट धारक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, आता हे बदल काय आहेत? ते पाहूयात.
१-२ गुंठ्यात जमीन करता येणार खरेदी-विक्री नवीन नियम लागू
पूर्वीचे काय नियम होते?
पूर्वी 25% बाजार मूल्याचे शुल्क भरावे लागायचे, जे नागरिकांसाठी मोठे आर्थिक ओझे होते. परिणामी, लोक कमी प्रतिसाद देत होते. आता ही समस्या दूर केली गेली आहे.
केवळ रेडीरेकनर दराच्या 5% रक्कम भरून व्यवहार नियमित करता येतील. हा नियम 1965 ते 2024 पर्यंतच्या सर्व व्यवहारांसाठी लागू असेल. गावागावात जमिनीच्या तुकड्यांसाठी सवलत राज्यातील जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे आणि बागायत जमिनीसाठी 10 गुंठे क्षेत्र मर्यादा होती. यामुळे घर बांधणे, विहीर खोदणे किंवा लहान भूखंड खरेदी करताना अडचणी निर्माण होत होत्या.
१-२ गुंठ्यात जमीन करता येणार खरेदी-विक्री नवीन नियम लागू
तसेच घर बांधण्यासाठी 500 स्क्वेअर फूटसारख्या लहान भूखंडांवरही व्यवहार शक्य होणार आहेत. विहीर, रस्ते, शेती पूरक सुविधा यासाठी कमी क्षेत्रातील जमिनीचे व्यवहार नियमित केले जाऊ शकतात.