लाडकी बहीण योजना या महिलांवर फौजदारी कारवाई सुरू अदिती तटकरे यांचा मोठा निर्णय

ladki behen scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळतात. सरकार अर्जदारांची सखोल छाननी करत असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

 

लाडकी बहीण योजना या महिलांवर फौजदारी कारवाई सुरू

तुमचे यादीत नाव चेक करा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असून आत्तापर्यंत राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांचे एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली, एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच राज्यातील, तसेच काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.

 

लाडकी बहीण योजना या महिलांवर फौजदारी कारवाई सुरू

तुमचे यादीत नाव चेक करा

 

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जागं झालं असून आता यासंदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ चुकीची माहिती देवून लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार’ अशी माहिती अदिती तटकरेंनी ट्विटमधून दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना या महिलांवर फौजदारी कारवाई सुरू

तुमचे यादीत नाव चेक करा

Leave a Comment