या 5.5 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही फेब्रुवारी चा हप्ता यादीत नाव पहा

ladaki bhain aaditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी ५१ लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा तीन हजार ८८५ कोटी रुपये लागतात. पण, आता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वतःहून लाभनाकारणाऱ्या लाभार्थीची संख्या पाच लाख ४० हजारांपर्यंत झाली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी आहेत, त्याची पडताळणी सुरु आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.

 

लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यांत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून त्या अर्जाची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर योजनेसंदर्भात काही तक्रारी आल्या. त्यानुसार आता योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार योजनेत अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती, याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थीच्या नावावरील चारचाकी वाहनांची पडताळणी सुरु आहे. त्यासाठी राज्य स्तरावरुन आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी पडताळणी सुरु झाली आहे.

 

लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

पडताळणीअंती त्यासंदर्भातील अहवाल आठ दिवसांत शासनाला सादर केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसंदर्भातील निर्णय राज्यस्तरावरुनच होणार आहे. त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभवितरित केला जाईल, अशी सद्यःस्थिती आहे. त्यासाठी मार्च उजाडेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबल्याची स्थिती आहे.

 

लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

आतापर्यंत योजनेचे ८२.५० कोटी रुपये झाले कमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे साडेपाच लाख महिला आतापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजनेसह स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या महिलांचा समावेश आहे. चारचाकी वाहनासह अन्य निकषांनुसार काटेकोर पडताळणीअंती आणखी काही लाख अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ कमी होईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment