अतिवृष्टी अनुदानाच्या गावानुसार लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव पहा

Crop Loss Subsidy : जून ते सप्टेंबर २०२४ च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी (ता. २५) राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील २३ हजार ६५ बाधित शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २५ लाख ६१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यानुसार लाभार्थी पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

या शासन निर्णयानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मयदित प्रतिहेक्टरी ४७ हजार रुपये या दराने मदत देण्यात येणार आहे. मदत मात्र ५ हजारांपेक्षा कमी नसावी, असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते, असं शेतकरी सांगतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहतात.

 

जिल्ह्यानुसार लाभार्थी पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकांसह शेत जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला होता. त्यावर तातडीने मदतीची मागणी शेतकरी करत होते. त्यावर अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

 

जिल्ह्यानुसार लाभार्थी पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

एकूण चार विभागातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपुर, नागपूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.

Leave a Comment