rbi bank news भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. RBI च्या कारवाईनंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी एकच गर्दी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यामुळे या बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ उडाला होता. या बँकेच्या देशात 26 शाखा आहेत. त्यात लाखो खातेदारांचे पैसे आहेत. आता त्यांना या कारवाईनंतर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुण्यापासून ते पालघरपर्यंत या बँकेत लाखो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. पैसे काढण्यासाठी खातेदारांची लांबच लांब रांग लागली आहे.
बँकेचे नाव आणि यादी पाहण्यासाठी
आता कर्जदारांचे काय होणार?
बँकेत अनेक लोकांचे कर्ज सुरू आहेत. या बँकेत ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांचे पुढे काय होणार? त्यांचा सिबील स्कोअर खराब होईल का, असे अनेक प्रश्न कर्जदारांना पण सतावत आहेत. त्यांच्यावर आता अधिक व्याजाचा बोजा पडणार का अशी पण त्यांना भीती आहे.
बँकेचे नाव आणि यादी पाहण्यासाठी
तुमच्या कर्जाचे काय होणार?
बँक बंद झाल्यावर, बँकेच्या मालमत्ता, स्थावर, जगंम संपत्ती विक्री करून त्यातून खातेदारांची रक्कम देण्यात येते. तुम्ही कर्जदार असाल तर तुमचे कर्ज खाते हे दुसऱ्या बँकेत हस्तांतरीत करण्यात येते. या ठिकाणी तुम्हाला कर्जाची फेड करावी लागते. त्यासंबंधीचे नियम संबंधित नवीन बँके तुम्हाला स्पष्ट करते. साधारणपणे बंद पडलेल्या सर्व कर्जदारांची खाती हे एकाच बँकेत हस्तांतरीत करण्यात येतात. अथवा काही वेळा त्या विविध बँकेत हस्तांतरीत करण्यात येतात.
बँकेचे नाव आणि यादी पाहण्यासाठी
FDIC आणि नवीन बँक कर्जदाराला त्याच्या खात्याची आणि झालेल्या व्यवहाराची सर्व माहिती देते. एक लिखित नोटीस पाठवण्यात येते. त्यानंतर नवीन बँक हप्ता कापण्यापूर्वी कर्जदाराची संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतो. तर हप्ता कापतीपूर्वी बँक खातेदाराला पूर्वसूचना देते. त्यात उरलेल्या हप्त्याविषयी, व्याजदर आणि इतर प्रक्रियेविषयीची सर्व माहिती देण्यात येते. त्यानंतर कर्जाचा हप्ता सुरू होतो. यापूर्वीच्या हप्ते ग्राह्य धरण्यात येतात. त्यासंबंधीचे सेटलमेंट करण्यात येते. त्यानंतर या बँकेत कर्जप्रकरण सुरू होते.