Post Office Savings Schemes : आजकाल देशभरात गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. काही लोक बँकांमध्ये गुंतवणूक करतात, तर काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये पैसा गुंतवण्यास पसंती देतात. पण एक गोष्ट जास्त लोकांना माहित नसते, ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून देखील तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
पोस्ट ऑफिस विविध आकर्षक व्याजदरांसह विविध गुंतवणूक योजनांची ऑफर देते. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये बँकांपेक्षा जास्त व्याज मिळवता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक योजनेबद्दल सांगणार आहोत.
पोस्ट ऑफिसची दामदुप्पट योजना अर्ज करण्यासाठी
सरकारी योजनेवर 7.5% व्याज
पोस्ट ऑफिसची “किसान विकास पत्र” (KVP) ही योजना सध्या 7.5% वार्षिक व्याज देते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागते. किमान 1000 रुपये गुंतवून तुम्ही या योजनेत भाग घेतला तरी, जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे, तुम्ही हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुमचे पैसे मॅच्युरिटीवर दुप्पट होतात, जे याचे मुख्य आकर्षण आहे.
पोस्ट ऑफिसची दामदुप्पट योजना अर्ज करण्यासाठी
मॅच्युरिटीवर दुप्पट पैसा
किसान विकास पत्र योजनेत तुमचे पैसे 115 महिन्यांमध्ये म्हणजेच 9 वर्षे आणि 7 महिन्यांमध्ये दुप्पट होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 5 लाख रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर एकूण 10 लाख रुपये मिळतील. याचप्रमाणे, 10 लाख रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील.
पोस्ट ऑफिसची दामदुप्पट योजना अर्ज करण्यासाठी
गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित
किसान विकास पत्र योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते आणि ती एक पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये तुम्ही जो पैसा गुंतवता, तो सुरक्षित असतो, आणि तुम्हाला हमी व्याज मिळते. यामुळे, या योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांना पैसा गमावण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.