अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
यासाठी सर्वप्रथम https://pfms.nic.in/ या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जायचं आहे.
यातील चौथा पर्याय म्हणजेच पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचा आहे यातील. नो युवर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये पेमेंट बाय अकाउंट नंबर अशी विंडो दिसेल.
यात सुरवातीला आपण वापरत असलेल्या बँकेचे नाव, (यात आपल्यासमोर बँकांचा यादी दाखवली जाईल, यातून आपली बँक निवडायची आहे.)
यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म करण्यासाठी पुन्हा बँक अकाऊंट नंबर टाकायचा आहे. यानंतर खालील बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाकायचा आहे.
यानंतर आपल्याला आधार लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी त्या रकान्यात टाकायचा आहे.
व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यानंतर आपल्या खात्यावरील माहिती आपल्याला खाली पूर्ण स्वरूपात दाखवली जाईल.
यात कोणत्या योजनेचे अनुदान, कोणत्या दिवशी आले आहे, किती आले आहे? हा सर्व तपशील दाखवला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रत्येक अनुदानाची माहिती उपलब्ध होईल.