ठाणे आणि पालघरसाठी
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल. ठाणे जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांना ३ लाख २ हजार रुपये, पालघर जिल्ह्यातील २७३० शेतकऱ्यांना ९ कोटी ६७ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील ११३ शेतकऱ्यांसाठी ३ लाख २५ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ६१ शेतकऱ्यांना १ लाख २१ हजार रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९६ शेतकऱ्यांना ५ लाख २ हजार रुपये वितरित केले जातील.
अमरावती विभागासाठी
अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात १५५ शेतकऱ्यांना ८९ लाख १७ हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील १४,७०६ शेतकऱ्यांना २२ कोटी ७३ लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील ९२५ शेतकऱ्यांना ४८ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील २,३७,२९६ शेतकऱ्यांना ३०० कोटी ३५ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील ४ शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये देण्यात आले आहेत.
पुणे आणि नाशिक विभागासाठी
पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील ९३२ शेतकऱ्यांसाठी ६८ लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील ८,१९९ शेतकऱ्यांना ८ कोटी ५ लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील ७९१ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख रुपये, नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांना १ लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील १५४१ शेतकऱ्यांना ९३ लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील ३१६ शेतकऱ्यांना ३६ लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील १५४० शेतकऱ्यांना १४ कोटी रुपये, अहमदनगर जिल्ह्यातील १२२४ शेतकऱ्यांसाठी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नागपूर विभागासाठी
नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील १२,९७० शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ७६ लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांसाठी १७ लाख रुपये, ३,९३३ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ८४ लाख रुपये, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील २,६८५ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ३९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. याप्रमाणे, राज्यातील एकूण ६ लाख ४३ हजार ५४२ शेतकऱ्यांना ७३३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले आहे.