ऑफर डिटेल्स जाणून घ्या

या ऑफरचा लाभ JioFiber आणि AirFiber वर उपलब्ध आहे, परंतु लक्षात घ्या की ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे जी केवळ 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वैध असेल. या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा, टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲप्सचा लाभ घेता येणार आहे. ट्रायल ऑफर अंतर्गत, तुम्हाला विनामूल्य सेट-टॉप बॉक्स, विनामूल्य राउटर आणि विनामूल्य इंस्टॉलेशनचा लाभ दिला जाईल.

विद्यमान ग्राहकांसाठी ऑफरचा लाभ

Jio Fiber आणि Jio AirFiber वापरणारे कंपनीचे विद्यमान ग्राहक देखील अतिरिक्त 50 दिवसांसाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर सक्रिय करण्यासाठी, विद्यमान वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 60008 60008 वर WhatsApp वर ‘Trial’ संदेश पाठवावा लागेल. तसेच या ट्रायल ऑफरचा फायदा तेव्हाच जोडला जाईल जेव्हा कंपनीने सांगितलेली रक्कम तुम्ही भरता किंवा रिचार्ज करता तेव्हा लाभ जोडला जाईल.

नवीन ग्राहकांसाठी माहिती

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, तुम्ही जर रिलायन्स जिओचे नवीन ग्राहक असाल आणि तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या 50 दिवसांच्या ट्रायल ऑफरचा लाभ घेण्यासाठी 1234 रुपये इतकी रिफंडेबल अमाऊंट द्यावी लागेल. जर तुम्हाला 50 दिवसांनंतर सेवा सुरू ठेवायची असेल तर तुम्ही ते करू शकता, परंतु जर तुम्हाला कंपनीची सेवा आवडत नसेल तर तुम्ही कंपनीकडून पैसे काढू शकता.

त्यासोबत नवीन ग्राहकांनी ही गोष्ट लक्षात घ्या कि या प्लॅन मध्ये तुम्ही जो परतावा म्हणजे रिफंडेबल अमाऊंट घेताना यातून सरकारी शुल्क वजा केल्यावर तुम्हाला 979 रुपये परत केले जातील. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जिओ स्टोअरला भेट देऊन या ऑफरबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.