योजनेबद्दल संपूर्ण डिटेल माहिती

पोस्ट ऑफिस ची ही सर्वात जास्त सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत पैसे तुमचे गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा टाईम पिरेड तुम्ही ठरवू शकता. परंतु हा टाईम पिरेड एक ते पाच वर्षांच्या मध्येच असला पाहिजे. सध्या सर्वात जास्त लोक या योजनेचा फायदा घेत आहेत.

कालावधी आणि व्याजदर Duration and interest rate

या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर याचा व्याजदर हा एका वर्षाच्या कालावधीसाठी हा 6.9% एवढा आहे. तर दोन वर्षाच्या कालावधीसाठी हा 7% आहे. तीन वर्षाच्या कालावधीसाठी हा 7.1% आहे आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक व्याजदर 7.5% आहे.

मित्रांनो या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला एक तीन आणि पाच अशा पटींच्या वर्षांमध्येच गुंतवणूक करायला लागेल म्हणजे एक वर्ष तीन वर्षे पाच वर्षे 10 वर्षे 15 वर्ष अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर आपण एक गणित पाहू ज्याच्यामध्ये आपलं कळेल की परतावा किती मिळेल.

गुंतवणूक आणि परतावा Investment and returns

जर तुम्ही या योजनेमध्ये दहा लाख रुपये पंधरा वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला किती त्याचा नफा मिळेल पाहू. पहिली पाच वर्षात तुमची मूळ गुंतवणूक असेल दहा लाख रुपये. व्याजदर असेल 7.5% पाच वर्षानंतर एकूण रक्कम होईल 14 लाख 49 हजार 948 रुपये आणि तुमचे निव्वळ व्याज तयार होईल चार लाख 49 हजार 948 रुपये.
त्यानंतर आता पुढचे पाच वर्ष म्हणजे मूळ रक्कम झाली 14 लाख 49 हजार 948 रुपये व्याजदर झाला 7.5% वार्षिक त्यानंतर एकूण दहा वर्षानंतर तुमच्या रक्कम होती 21 लाख 52 हजार 349 रुपये तुम्हाला एकूण निव्वळ व्याज 11 लाख 52 हजार 3009 रुपये झाले आहे.
आता पुढच्या पंधरा वर्षासाठी आता तुमची मूळ रक्कम आहे 21 लाख 52 हजार 349 रुपये व्याजदर झाला 7.5% वार्षिक त्यानंतर 15 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम झाली तीस लाख 48 हजार 297 रुपये आणि एकूण व्याज झालं 20 लाख 48 हजार 297 रुपये.