किती जमीन खरेदी करू शकतो…

दरम्यान महाराष्ट्रात एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो, याबाबतचा सिलिंग कायद्यातील नियम समजून घेऊयात, सिलिंग कायद्यानुसार बागायती शेती असेल म्हणजे ज्या ठिकाणी बारा महिने शेती केली जाऊ शकते, अशी बागायती शेती असल्यास एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 18 एकर जमीन खरेदी करता येते. मात्र जर शेती ही हंगामी बागायती असेल तर अशावेळी एक शेतकरी जास्तीत जास्त 36 एकर जमीन खरेदी करू शकतो.

म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त 36 एकर हंगामी बागायती जमीन असू शकते. जिथे बारा महिने पाणीपुरवठा नाही, पण एका पिका‌साठी पाणीसाठा आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त 27 एकर जमीन खरेदी करता येते. पण जर जमीन कोरडवाहू असेल तर एक शेतकरी जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन खरेदी करू शकतो. म्हणजेच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन असू शकते.